Right News Online - नितीन राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे खोदा पहाड निकला चुहा
20 Nov 2020 14:18:07
नितीन राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असे त्याचे वर्णन करता येईल. ते म्हणतात आम्ही शेतकऱ्यांची वीज बिले वीसहजार कोटीची माफ करू. पण त्यांच्या स्कीम अशी आहे की, जर शेतकऱ्यांनी दहाहजार रुपये भरले, तर त्याला दहाहजाराचे क्रेडिट मिळेल म्हणजे त्याचे पुढचे पैसे माफ होतील.
सरकार जेंव्हा वीसहजारकोटी माफ करेल असं म्हणत याचं अर्थ माझ्या शेतकरी बांधवाना, ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ज्याला पैशाची गरज आहे त्याला ते वीस हजार कोटी रुपये सरकारला द्यावे लागतील तर ती योजना सुरु होईल. मला असं वाटतं की अश्या फसव्या योजना नितीन राऊतांनी थांबवाव्यात. उगाचच विषयाची दिशाभूल करु नये, अन्यथा भारतीय जनता पक्ष आपले आंदोलन तीव्र करेल.